व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलमुळे जीवन बदलतं

त्यांना “एक खूप मौल्यवान मोती सापडला”

त्यांना “एक खूप मौल्यवान मोती सापडला”

 येशू ख्रिस्ताने असं शिकवलं की देवाचं राज्य माणसांच्या सगळ्या समस्या सोडवेल. (मत्तय ६:१०) येशूने मत्तय १३:४४-४६ या वचनांत, देवाच्या राज्याचं सत्य किती मौल्यवान आहे हे समजण्यासाठी पुढे दिलेली दोन उदाहरणं सांगितली:

  •   शेतात काम करणाऱ्‍या एका माणसाला लपवून ठेवलेला खजिना अचानक सापडतो.

  •   एक व्यापारी मौल्यवान मोत्यांच्या शोधात देशोदेशी फिरत असतो, तेव्हा त्याला एक खूप मौल्यवान मोती सापडतो.

 या दोन्ही माणसांनी त्यांना सापडलेली मौल्यवान गोष्ट मिळवण्यासाठी आनंदाने आपल्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी विकल्या. या उदाहरणातली दोन्ही माणसं कोणाला सूचित करतात? जे लोक देवाच्या राज्याला खूप मौल्यवान समजतात आणि देवाच्या राज्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मोठमोठे त्याग करतात त्यांना ही माणसं सूचित करतात. (लूक १८:२९, ३०) या व्हिडिओत, येशूच्या उदाहरणातल्या माणसांसारखीच मनोवृत्ती असलेल्या आपल्या काळातल्या दोन व्यक्‍तींचा अनुभव पाहा.