व्हिडिओ पाहण्यासाठी

एखाद्या धार्मिक संघटनेचा भाग असणं गरजेचं आहे का?

एखाद्या धार्मिक संघटनेचा भाग असणं गरजेचं आहे का?

बायबलचं उत्तर

 हो. कारण देवाची इच्छा आहे की लोकांनी एकत्र येऊन त्याची उपासना करावी. बायबल म्हणतं: “एकमेकांचा विचार करून आपण प्रेम आणि चांगली कार्यं करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ या. . . . आपण एकत्र येणं सोडू नये.”​—इब्री लोकांना १०:२४, २५.

 येशूचीही इच्छा होती की त्याच्या अनुयायांनी संघटित असावं. म्हणूनच तो म्हणाला: “तुमचं एकमेकांवर प्रेम असेल, तर यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.” (योहान १३:३५) ख्रिस्ताचे अनुयायी आपल्यासारखाच विश्‍वास असलेल्या भाऊबहिणींसोबत एकत्र येण्याद्वारे हे प्रेम दाखवतात. त्यांच्या मंडळ्या आहेत आणि ते नियमितपणे या मंडळ्यांमध्ये उपासनेसाठी एकत्र येतात. (१ करिंथकर १६:१९) संपूर्ण जगात त्यांचा एक मोठा बंधुसमाज आहे.​—१ पेत्र २:१७.

पण फक्‍त धर्माचा भाग असणं पुरेसं नाही

 हे खरंय, की देवाची उपासना करण्यासाठी आपण इतरांसोबत एकत्र आलं पाहिजे असं बायबल सांगतं. पण फक्‍त एखाद्या धर्माचा भाग असल्यामुळे आपण देवाला खूश करू शकतो असं त्यात सांगितलेलं नाही. देवाने आपली उपासना स्वीकारावी म्हणून आपण दररोजच्या जीवनात आपल्या धार्मिक विश्‍वासांप्रमाणे वागलं पाहिजे. बायबलमध्ये म्हटलंय: “आपला देव आणि पिता याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ उपासना [किंवा, “धर्म”] हीच आहे, की आपण अनाथ आणि विधवा यांच्या कठीण परिस्थितीत त्यांची काळजी घ्यावी आणि स्वतःला या जगात निष्कलंक ठेवावं.”​—याकोब १:२७.