व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जागे राहा!

सभ्यता संपत चालली आहे का?—बायबल काय म्हणतं?

सभ्यता संपत चालली आहे का?—बायबल काय म्हणतं?

 आजकाल फार कमी लोक इतरांशी सभ्यतेने वागताना दिसतात. समाजात आपल्याला सहसा असंच चित्र बघायला मिळतं: उद्धट लोक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवर ओरडतात. हॉटेलमध्ये जेवायला आलेले लोक वेटरला चांगली वागणूक देत नाहीत. विमानात काम करणाऱ्‍या महिलांसोबत आणि इतरांसोबत लोक असभ्यपणे वागतात. शाळेत जाणारी मुलं शिक्षकांची टिंगल-टवाळी करतात, त्यांना धमकावतात. काही राजकारणी फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये अडकतात, तर काही राजकारणी आपण इतरांपेक्षा किती सभ्य आहोत हे दाखवायचा प्रयत्न करतात.

 सभ्यपणा म्हणजे नेमकं काय आणि आपण तो कसा दाखवला पाहिजे, हे बायबल आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगतं. यासोबतच ते आपल्याला हेसुद्धा समजायला मदत करतं, की आज लोक सभ्यपणे का वागत नाहीत.

लोकांमध्ये आज सभ्यपणा का कमी होत चाललाय?

 सभ्यपणा म्हणजे इतरांशी चांगलं वागणं; नैतिक स्तरांनुसार आणि समाजात मान्य असेल अशा पद्धतीने वागणं. पण आज सगळ्याच देशांमध्ये सभ्यपणा कमी झालेला दिसतो.

  •   एका सर्व्हेनुसार, अमेरिकेत राहणाऱ्‍या लोकांना असं वाटतं, की मागच्या २२ वर्षांचा विचार केला, तर आधी लोक जितके सभ्य आणि नैतिक गोष्टींना धरून होते तेवढे आता नाहीत. लोकांचे नैतिक स्तर फार ढासळलेत.

  •   २८ देशांमध्ये आणखी एक सर्व्हे घेण्यात आला. त्यात ३२,००० लोकांनी सहभाग घेतला. त्यातल्या ६५ टक्के लोकांनी म्हटलं, की आज फार कमी लोक सभ्यता दाखवतात.

 बायबलमध्ये याबद्दल आधीच सांगितलं होतं.

  •   ‘शेवटच्या दिवसांत खूप कठीण काळ येईल हे लक्षात ठेव. कारण, लोक फक्‍त स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे, बढाई मारणारे, गर्विष्ठ, निंदा करणारे, आईवडिलांचं न ऐकणारे, उपकारांची जाण न ठेवणारे, बेइमान, माया-ममता नसलेले, कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे, इतरांची बदनामी करणारे, संयम नसलेले आणि क्रूर असे असतील.’—२ तीमथ्य ३:१-३, नवे जग भाषांतर.

 बायबलमध्ये सांगितलेली भविष्यवाणी कशी पूर्ण होत आहे याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी इंग्रजीतला हा लेख वाचा “डिड द बायबल प्रेडिक्ट द वे पिपल थिंक ॲन्ड ॲक्ट टुडे?

बायबलमुळे कशी मदत होऊ शकते?

 जगात सगळीकडेच सभ्यतेने वागणं कमी झालंय. पण लाखो लोकांना इतरांशी चांगलं आणि सभ्यतेने वागायला बायबलमुळे मदत झाली आहे. कारण, बायबलमधले सल्ले “आज आणि सर्वकाळासाठी भरवशालायक आहेत.” (स्तोत्र १११:८) काही उदाहरणं पाहा:

  •   बायबलमध्ये म्हटलंय: “ज्या गोष्टी इतरांनी आपल्यासाठी कराव्यात असं तुम्हाला वाटतं, त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत.”—मत्तय ७:१२.

     अर्थ: इतरांनी आपल्याशी आदराने आणि सभ्यतेने वागावं असं आपल्याला वाटतं. त्यामुळे आपणही इतरांशी तसंच वागलं पाहिजे.

  •   बायबलमध्ये म्हटलंय: “आता तुम्ही खोटेपणा सोडून दिला आहे. त्यामुळे यापुढे तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्‍याशी खरं बोलावं.”—इफिसकर ४:२५.

     अर्थ: आपण आपल्या वागण्या-बोलण्यात आणि प्रत्येक कामात प्रामाणिक असलं पाहिजे.

 या विषयावर आणखी माहिती मिळवण्यासाठी हे लेख वाचा: