व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

AspctStyle/stock.adobe.com

स्मारकविधीची मोहीम

येशू युद्धांचा अंत करेल

येशू युद्धांचा अंत करेल

 येशूचं लोकांवर किती प्रेम आहे हे त्याने पृथ्वीवर असताना दाखवलं. इतकंच काय तर त्याने त्यांच्यासाठी स्वतःचं जीवनसुद्धा दिलं. (मत्तय २०:२८; योहान १५:१३) लवकरच, देवाच्या राज्याचा राजा म्हणून, तो आपल्या अधिकाराचा वापर करून “सबंध पृथ्वीवर युद्धांचा अंत” करेल. (स्तोत्र ४६:९) अशा प्रकारे तो पुन्हा एकदा दाखवून देईल की त्याचं माणसांवर किती प्रेम आहे.

 येशू काय करणार आहे याबद्दल बायबल काय म्हणतं ते पाहा:

  •   “कारण साहाय्यासाठी हाक मारणाऱ्‍या गरिबांची; दीनदुबळ्या आणि असाहाय्य लोकांची तो सुटका करेल. दीनदुबळ्यांवर आणि गरिबांवर तो दया करेल; गोरगरिबांचे जीव तो वाचवेल. तो त्यांची अत्याचारापासून आणि हिंसेपासून सुटका करेल.”​—स्तोत्र ७२:१२-१४.

 येशूने आपल्यासाठी जे काही केलंय आणि पुढे जे काही करणार आहे, त्याबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो? लूक २२:१९ मध्ये येशूने त्याच्या शिष्यांना त्याच्या मृत्यूची आठवण करायला सांगितलं. त्यामुळे दरवर्षी यहोवाचे साक्षीदार त्याच्या मृत्यूच्या स्मारकविधीसाठी एकत्र जमतात. या वर्षी रविवार, २४ मार्च २०२४ ला आम्ही तुम्हाला आमच्यासोबत येशूच्या स्मारकविधीसाठी हजर राहायचं आमंत्रण देतो.

स्मारकविधीचं​ ठिकाण​ शोधा