व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

panitan/stock.adobe.com

स्मारकविधीची मोहीम

येशू गरीबीचा अंत करेल

येशू गरीबीचा अंत करेल

 येशूचं लोकांवर किती प्रेम आहे, खासकरून गरीब आणि दुःखी लोकांवर, हे त्याने पृथ्वीवर असताना दाखवलं. (मत्तय ९:३६) इतकंच काय, तर त्याने लोकांसाठी स्वतःच्या जिवाचं बलिदान दिलं. (मत्तय २०:२८; योहान १५:१३) लवकरच देवाच्या राज्याचा राजा म्हणून, तो आपल्या अधिकाराचा वापर करून संपूर्ण पृथ्वीवरून गरीबीचा अंत करेल. अशा प्रकारे तो पुन्हा एकदा दाखवून देईल, की त्याचं माणसांवर किती प्रेम आहे.

 येशू गरीबांसाठी नेमकं काय करणार आहे, याचं बायबलमध्ये फार सुंदर शब्दांमध्ये वर्णन करण्यात आलंय:

  •   “त्याने लोकांमधल्या दीनदुबळ्यांचं समर्थन करावं. गोरगरिबांच्या मुलाबाळांना वाचवावं.”​—स्तोत्र ७२:४.

 येशूने आपल्यासाठी जे काही केलंय आणि पुढे जे काही करणार आहे, त्याबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो? लूक २२:१९ मध्ये येशूने त्याच्या शिष्यांना त्याच्या मृत्यूची आठवण करायला सांगितलं. त्यामुळे दरवर्षी यहोवाचे साक्षीदार त्याच्या मृत्यूच्या स्मारकविधीसाठी एकत्र जमतात. या वर्षी रविवार, २४ मार्च २०२४ ला आम्ही तुम्हाला आमच्यासोबत येशूच्या स्मारकविधीसाठी हजर राहायचं आमंत्रण देतो.

स्मारकविधीचं​ ठिकाण​ शोधा