व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

John Moore/Getty Images

खास मोहीम

आरोग्य​—देवाचं राज्य याबद्दल काय करेल

आरोग्य​—देवाचं राज्य याबद्दल काय करेल

 “कोव्हिड-१९ महामारीमुळे आधीसारखी आणीबाणीची परिस्थिती जरी राहिली नसली, तरी याचा अर्थ असा होत नाही की आता जगभरात या महामारीचा धोका राहिलेला नाही. पुढे आणखी एक महामारी नक्की येईल आणि आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे.”​—डॉ. टेडरॉस अदनाम गॅब्रीएसस, जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर-जनरल, २२ मे २०२३.

 कोव्हिड महामारीमुळे आजही अनेकांना बऱ्‍याच शारीरिक आणि मानसिक आजारांना तोंड द्यावं लागतंय. पुढे येणाऱ्‍या महामारीचा सामना करायला सरकारं आणि आरोग्य सेवा पुरवणाऱ्‍या संघटना तयार आहेत का? आणि सद्ध्या ज्या आरोग्याच्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय त्यांवर त्यांच्याकडे काही उपाय आहे का?

 आपल्याला चांगलं आरोग्य देऊ शकेल अशा एका सरकाराबद्दल बायबल आपल्याला सांगतं. त्यात म्हटलंय: ‘स्वर्गाचा देव एक राज्य [किंवा सरकार] स्थापन करेल.’ (दानीएल २:४४) देवाचं ते सरकार या पृथ्वीवर शासन करेल, तेव्हा “‘मी आजारी आहे’ असं देशातला एकही रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) त्या वेळी, तरुणांमध्ये जसा उत्साह असतो आणि त्यांचं आरोग्य चांगलं असतं, तसं आरोग्य आणि उत्साह सगळे जण अनुभवतील.​—ईयोब ३३:२५.