व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्न ९

मी उत्क्रांतिवादावर विश्वास ठेवायला हवा का?

मी उत्क्रांतिवादावर विश्वास ठेवायला हवा का?

हे जाणून घेणं महत्त्वाचं का आहे?

जर उत्क्रांतिवाद किंवा एव्होल्यूशन खरं आहे तर जीवनाला उद्देश उरणार नाही. पण जर का निर्मिती खरी आहे तर आपल्याला जीवनाविषयी आणि भविष्याविषयी अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळू शकतील.

तुम्ही काय केलं असतं?

कल्पना करा: अॅलेक्सचा, देवावर आणि देवानेच सर्व काही निर्माण केलं यावर विश्वास आहे. पण आज सायन्सच्या टिचरने उत्क्रांतिवाद खरा आहे आणि तो विश्वसनीय वैज्ञानिक संशोधनावर आधारलेला आहे असा ठामपणे दावा केला. आता अॅलेक्स विचारात पडला आहे. सर्व क्लाससमोर अॅलेक्सला मूर्ख ठरायचं नाहीये. त्यामुळे तो मनात म्हणतो ‘तसंही, जर वैज्ञानिकांनी एव्होल्यूशन खरं असल्याचा सिद्ध केलंच आहे, तर मी या गोष्टीवर शंका कशी घेऊ शकतो?’

जर तुम्ही अॅलेक्सच्या जागी असता, तर फक्त तुमच्या टेक्स्टबुकमध्ये उत्क्रांतिवाद खरा असल्याचं सांगितल्यामुळे तुम्ही त्यावर विश्वास ठेवला असता का?

थांबा आणि विचार करा!

उत्क्रांतिवाद किंवा एव्होल्यूशन खरं आहे की निर्मिती खरी आहे यावर वाद करणारे दोन्ही पक्ष आपण काय विश्वास करतो हे पटकन सांगून मोकळे होतात. पण ते तसा विश्वास का करतात हे त्यांना पूर्णपणे माहीतच नसतं.

  • काही लोक निर्मितीवर फक्त यासाठी विश्वास करतात कारण त्यांना तशी धार्मिक शिकवण दिली गेली आहे.

  • काही लोक उत्क्रांतिवादावर फक्त यासाठी विश्वास करतात कारण त्यांना तसं शाळेत शिकवलं गेलं आहे.

या सहा प्रश्नांवर विचार करा

बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्व काही बांधणारा देवच आहे.” (इब्री लोकांस ३:४) पण यावर विश्वास करणं योग्य आहे का?

जीवनाची सुरुवात निर्माणकर्त्याशिवाय झाली असं म्हणणं म्हणजे हे घर आपोआप तयार झालं असा अविचारीपणे दावा करण्यासारखं आहे

दावा: या विश्वात सर्वकाही एका मोठ्या स्फोटामुळे अर्थात ‘बिग बँगमुळे’ अस्तित्वात आलं.

१. कुणामुळे किंवा कशामुळे हा विस्फोट झाला?

२. सर्वकाही आपोआप आलं ही गोष्ट तुम्हाला पटते, की सर्वकाही कशापासून तरी किंवा कुणीतरी घडवलं, ही गोष्ट तुम्हाला पटते?

दावा: माणसं प्राण्यांपासून आली.

३. जर माणसं प्राण्यांपासून आली, उदाहरणार्थ माकडांपासून तर माणसांच्या बौद्धिक क्षमतेत आणि माकडांच्या बौद्धिक क्षमतेत एवढा मोठा फरक का?

४. अगदी “लहानातल्या लहान” जीवांची रचनादेखील इतकी जटील का आहे?

दावा: उत्क्रांतिवादाला सिद्ध करणारे पुरावे आहेत.

५. असा दावा करणाऱ्या व्यक्तीने स्वतः या पुराव्यांचं परीक्षण केलं आहे का?

६. अनेक लोक फक्त यासाठी उत्क्रांतिवादावर विश्वास करतात कारण त्यांना सांगितलं गेलं आहे की सर्व बुद्धिमान लोक त्यावर विश्वास करतात.

“तुम्ही जंगलातून जात आहात आणि अचानक तुम्हाला तिथं एक सुंदर घर दिसलं तर तुम्ही असा विचार कराल का: ‘वा, किती छान आहे हे घर! झाडं अगदी बरोबर जागच्याजागी पडल्यामुळे हे घर तयार झालं.’ मुळीच नाही! कारण तसं होणं शक्यच नाही. मग या विश्वात सर्वकाही आपोआप आलं यावर आपण कसा काय विश्वास ठेवू शकतो?”—जूलिया.

“समजा तुम्हाला कुणी सांगितलं, की एका छापखान्यात विस्फोट झाला आणि शाई भिंतीवर, छतावर सर्वत्र उडाली आणि त्यामुळे एका डिक्शनरीचा मजकूर तयार झाला. यावर तुम्ही विश्वास ठेवाल का?”—ग्वेन.

देव आहे यावर विश्वास का ठेवावा?

बायबलमध्ये असं उत्तेजन देण्यात आलं आहे की आपण, “सर्व गोष्टींची पारख” केली पाहिजे. (१ थेस्सलनीकाकर ५:२१) म्हणजे तुमचा देवावरील विश्वास फक्त पुढील गोष्टींमुळे नसला पाहिजे

  • तुमच्या भावना (मला मनापासून वाटतं की आपल्यापेक्षा मोठी शक्ती आहे)

  • तुमची संस्कृती (मी एका धार्मिक समाजात राहतो)

  • तुमचं शिक्षण (माझ्या आईबाबांनी मला लहानपणापासून देवावर विश्वास करायला शिकवलं, माझ्याकडे दुसरं कशावर विश्वास करायला पर्यायच नव्हता)

या सर्व गोष्टींऐवजी तुमच्याकडे देवावर विश्वास ठेवण्याची सबळ कारणं असायला हवी.

“क्लासमध्ये टिचर जेव्हा आपल्या शरीरातील अवयव कसे कार्य करतात हे समजावत असते, तेव्हा देव अस्तित्वात आहे याबद्दल मला कसलीच शंका उरत नाही. प्रत्येक अवयवाची कार्य करण्याची एक स्वतंत्र पद्धत असते आणि अगदी लहानसहान गोष्टींचाही विचार केलेला असतो. आपल्याला कोणतीही जाणीव झाल्याशिवाय ते अगदी सुरळीत कार्य करतात. खरंच! आपल्या शरीराच्या रचनेविषयी विचार केला तर आपण अगदी भारावून जातो.”—टेरेसा.

“जेव्हा मी एखादी उंच इमारत, मोठं जहाज किंवा कार पाहतो तेव्हा मी स्वतःला विचारतो, ‘कुणी बनवलं असेल हे?’ उदाहरणार्थ, एक कार बनवायला अनेक बुद्धिमान लोकांची गरज असते कारण त्यातील अनेक छोटे-छोटे पार्ट्‌स नीट काम करतील तरच पूर्ण गाडी नीट चालेल. जर गाडीची कुणीतरी रचना केली आहे तर माणसांचीही नक्कीच केली असणार.”—रिचर्ड.

“मी जेवढा जास्त सायन्सचा अभ्यास करत गेलो, तेवढा जास्त मला उत्क्रांतिवाद खरा नसल्याचं जाणवलं. . . . एक निर्माणकर्ता आहे यापेक्षा उत्क्रांतीवादावर विश्वास करणं मला जास्त कठीण वाटतं.”—अॅन्थनी.

यावर विचार करा

बरीच दशकं संशोधन करूनही वैज्ञानिकांना उत्क्रांतिवादाबद्दल असा विचार मांडता आलेला नाही ज्यावर त्या सर्वांचं एकमत होईल. या विषयातील जाणकार लोकांचंच जर उत्क्रांतिवादावर एकमत होत नाही, तर आपण या सिद्धांतावर शंका घेतली तर कुठं चुकलो?