व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | बायबल वाचनातून जास्त फायदा मिळवा

बायबल का वाचलं पाहिजे?

बायबल का वाचलं पाहिजे?

“मला वाटायचं बायबल समजायला खूप कठीण असेल.”—जोवी

“मला वाटायचं ते बोरींग असेल.”—क्विनी

“मी जेव्हा पाहिलं, की बायबल किती जाड पुस्तक आहे तेव्हा ते वाचायची, माझी इच्छाच झाली नाही.”—एजेकीयेल

तुम्ही कदाचित बायबल वाचायचा विचार केला असेल, पण वर दिलेल्या व्यक्तींसारखे विचार आल्यामुळे, तुम्ही ते वाचायचं टाळलं असेल. खूप लोकांना बायबल वाचणं, डोंगर चढण्या इतकं कठीण वाटतं. पण जर तुम्हाला कळलं, की बायबल वाचल्यामुळे तुम्हाला आनंदी आणि समाधानी जीवन जगता येईल आणि ते वाचन करण्यासाठी काही चांगल्या पद्धती आहेत, तर हे पुस्तक तुम्हाला कशी मदत करू शकते, हे एकदा तरी तुम्ही वाचून पाहाल का?

बायबल वाचन सुरू केल्यामुळे ज्यांना फायदा झाला, अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया पुढे दिल्या आहेत.

एजेकीयेल जो कदाचित २२-२३ वर्षांचा असेल म्हणतो: “आधी मी एका अशा ड्रायव्हरसारखा होतो, ज्याला कुठं जायचं हे माहीत नव्हतं. पण बायबलचं वाचन केल्यामुळे माझ्या जीवनाला दिशा मिळाली आहे. यात असे व्यावहारिक सल्ले दिले आहेत जे मी रोजच्या जीवनात वापरू शकतो.”

फ्रिडा जिचं वयदेखील विशीत आहे म्हणते: “माझा स्वभाव खूप रागीट होता. पण बायबल वाचन सुरू केल्यामुळे मी माझ्या रागावर नियंत्रण मिळवू शकले. यामुळे आता इतरांशी जुळवून घेणं मला सोपं वाटतं आणि माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत.”

युनीस ज्यांचं वय पन्नाशीत आहे, त्या बायबलविषयी म्हणतात, “बायबलमुळे मला एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी आणि माझ्या वाईट सवयी बदलण्यासाठी मदत झाली आहे.”

वर दिलेल्या बायबल वाचकांना आणि अशाच लाखो लोकांना समजलं आहे, की बायबल वाचन केल्यामुळे आपण आपलं जीवन आनंदी बनवू शकतो. (यशया ४८:१७, १८) बायबल वाचन केल्यामुळे (१) आपल्याला चांगले निर्णय घेता येतात, (२) आपण खरे मित्र बनवू शकतो, (३) आपल्याला चिंतांवर मात करता येते, आणि (४) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, देवाबद्दल आपल्याला सत्य जाणता येतं. बायबलमध्ये दिलेला सल्ला देवाकडून असल्यामुळे तो लागू केल्याने आपलं कधीच नुकसान होणार नाही. कारण देव कधीच वाईट सल्ला देत नाही.

पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण बायबल वाचन सुरू केलं पाहिजे. बायबल वाचन सोपं बनवण्यासाठी आणि त्यातून आनंद मिळवण्यासाठी कोणते व्यावहारिक मार्ग आहेत?