व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संकटांच्या विळख्यात जग

२ | पैसा आणि मालकीच्या वस्तू जपा

२ | पैसा आणि मालकीच्या वस्तू जपा

हे महत्त्वाचं का आहे?

काही लोकांना आपल्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जगातल्या समस्यांमुळे हे आणखी कठीण होऊ शकतं. का?

  • ज्या ठिकाणी खूप समस्या किंवा विपत्ती असतात त्या ठिकाणी सहसा महागाई खूप वाढते.

  • अशा वेळी बेरोजगारी वाढते किंवा कमी पगारात काम करावं लागतं.

  • विपत्तींमुळे उद्योग-धंद्यांवर वाईट परिणाम होतो. घरांचं आणि मालमत्तेचं मोठं नुकसान होतं आणि बऱ्‍याच लोकांवर गरिबी ओढवते.

तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?

  • तुम्ही पैसे जितके जपून वापराल तितकंच कठीण परिस्थितीचा सामना करायला तुम्हाला सोपं जाईल.

  • आर्थिक परिस्थिती आज चांगली आहे म्हणून उद्याही चांगलीच राहील असं नाही. तुमच्या मिळकतीचं, बँकेतल्या पैशांचं आणि मालमत्तेचं मूल्य अचानक घसरू शकतं.

  • आनंद आणि चांगली नाती यांसारख्या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत.

तुम्ही आत्ता काय करू शकता?

बायबल म्हणतं: “आपल्याजवळ खायला अन्‍न आणि घालायला कपडे असतील, तर आपण त्यांत समाधानी राहू या.”​—१ तीमथ्य ६:८.

समाधानी राहणं म्हणजे, सुखसोयींच्या  मागे धावण्याऐवजी आपल्या रोजच्या गरजा  भागतात तेव्हा त्यात खूश असणं. खासकरून आपल्याला जेव्हा कमी पैशात भागवावं लागतं तेव्हा हे खूप महत्त्वाचं आहे.

समाधानी राहण्यासाठी तुम्हाला कदाचित काटकसरीने राहायला शिकावं लागेल. ऐपतीपेक्षा जास्त खर्च केला तर तुमची आर्थिक परिस्थिती आणखीनच खराब होईल.