व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यासासाठी विषय

खोलवर अभ्यास करून सावध राहा

खोलवर अभ्यास करून सावध राहा

दानीएल ९:१-१९ वाचा आणि खोलवर अभ्यास करणं का महत्त्वाचंय ते जाणून घ्या.

संदर्भ लक्षात घ्या. त्या वेळी नुकत्याच कोणत्या घटना घडल्या होत्या आणि त्यांचा दानीएलवर कसा परिणाम झाला? (दानी. ५:२९–६:५) तुम्ही दानीएलच्या जागी असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं?

सखोल संशोधन करा. दानीएलने कोणत्या “पवित्र पुस्तकांतून” माहिती घेतली असेल? (दानी. ९:२, तळटीप; टेहळणी बुरूज२३.०८ ४ ¶७) दानीएलने त्याची आणि  इस्राएल राष्ट्राची पापं कबूल का केली? (लेवी. २६:३९-४२; १ राजे ८:४६-५०; दानिय्येल की भविष्यवाणी  अध्या. ११ ¶४-९) दानीएलच्या प्रार्थनेवरून कसं दिसून आलं, की तो देवाच्या वचनाचा खोलवर अभ्यास करायचा?​—दानी. ९:११-१३.

तुम्हाला काय शिकायला मिळतंय यावर विचार करा. स्वतःला विचारा: