व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाच्या साक्षीदारांचा संस्थापक कोण होता?

यहोवाच्या साक्षीदारांचा संस्थापक कोण होता?

 यहोवाच्या साक्षीदारांच्या आधुनिक संघटनेची सुरुवात १९ व्या शतकाच्या अखेरीस झाली होती. त्या वेळी, अमेरिकेच्या पेन्सिल्वेनिया, पिट्‌सबर्ग भागात राहणाऱ्‍या बायबल विद्यार्थ्यांच्या एका लहानशा गटाने बायबलचा पद्धतशीरपणे अभ्यास करण्यास सुरुवात केली. चर्चमध्ये शिकवल्या जाणाऱ्‍या शिकवणींचा आणि बायबलमध्ये त्यांबद्दल जे सांगितले आहे यांचा त्यांनी तुलनात्मक अभ्यास केला. या अभ्यासातून जे काही निष्पन्‍न झाले ते त्यांनी पुस्तकांच्या, वृत्तपत्रांच्या आणि सध्या ज्याला टेहळणी बुरूज–यहोवाच्या राज्याचा प्रकाशक  असे म्हणतात या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित केले.

 त्या प्रामाणिक बायबल विद्यार्थ्यांच्या गटात चार्ल्स टेझ रस्सल हेदेखील होते. रस्सल यांनी त्या वेळी बायबलच्या शैक्षणिक कार्यात पुढाकार घेतला असला आणि ते टेहळणी बुरूज  नियतकालिकाचे पहिले संपादक असले तरी त्यांनी कोणत्याही नव्या धर्माची स्थापना केली नाही. रस्सल आणि इतर बायबल विद्यार्थी (त्या वेळी हा गट बायबल विद्यार्थी या नावाने ओळखला जायचा) यांचा उद्देश येशू ख्रिस्ताच्या शिकवणींचा प्रसार करणे आणि पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीच्या कार्यांचे अनुकरण करणे हा होता. ख्रिस्ती धर्माची स्थापना येशूने केली असल्यामुळे तोच आमच्या संघटनेचा संस्थापक आहे असे आम्ही मानतो.—कलस्सैकर १:१८-२०.