व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार वैद्यकीय उपचार घेतात का?

यहोवाचे साक्षीदार वैद्यकीय उपचार घेतात का?

 हो, यहोवाचे साक्षीदार औषधे व वैद्यकीय उपचार घेतात. आम्ही आमच्या शरीराची काळजी घेत असलो आणि चांगले आरोग्य ठेवण्याचा प्रयत्न करत असलो तरी कधीकधी आम्हाला “वैद्याची गरज” पडते. (लूक ५:३१) खरेतर, पहिल्या शतकात जसा लूक नावाचा एक ख्रिस्ती वैद्य होता तसेच आजही यहोवाच्या साक्षीदारांमध्ये काही डॉक्टर्स आहेत.—कलस्सैकर ४:१४.

 काही औषधोपचार बायबलच्या विरोधात असल्यामुळे आम्ही ते घेत नाहीत. उदाहरणार्थ, आम्ही रक्‍तसंक्रमण नाकारतो कारण शरीराचे पोषण होण्याकरता रक्‍त शरीरात घेण्याचा बायबल निषेध करते. (प्रेषितांची कृत्ये १५:२०) त्याचबरोबर, भूतविद्येचा समावेश असलेले औषधोपचार किंवा उपचारपद्धती यांचादेखील बायबल निषेध करते.—गलतीकर ५:१९-२१.

 पण, बऱ्‍याच उपचारपद्धती बायबल तत्त्वांच्या विरोधात नाहीत आणि त्या उपचारपद्धती निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. एक यहोवाचा साक्षीदार एखादे औषध किंवा उपचारपद्धती स्वीकारण्याचा निर्णय घेईल पण तेच दुसरा कदाचित स्वीकारणार नाही.—गलतीकर ६:५.