व्हिडिओ पाहण्यासाठी

देवाचं राज्य आपल्यासाठी काय करेल?

देवाचं राज्य आपल्यासाठी काय करेल?

बायबलचं उत्तर

 देवाचं राज्य मानवी सरकारांना काढून या संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल. (दानीएल २:४४; प्रकटीकरण १६:१४) यानंतर, देवाचं राज्य:

  •   अशा “दुष्ट लोकांचा पृथ्वीवरून नाश” करेल, ज्यांच्या स्वार्थीपणामुळे आपलं नुकसान होतं.​—नीतिवचनं २:२२.

  •   सर्व युद्धांचा अंत करेल. “[देव] सबंध पृथ्वीवर युद्धांचा अंत करतो.”​—स्तोत्र ४६:९.

  •   पूर्ण पृथ्वीवर शांती आणि सुरक्षा आणेल. “प्रत्येक जण आपल्या द्राक्षवेलाखाली आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल, कोणीही त्यांना घाबरवणार नाही.”​—मीखा ४:४.

  •   पृथ्वीला बागेसारखं सुंदर बनवेल. “ओसाड प्रदेश आणि कोरडी भूमी आनंदित होईल, वाळवंट हर्ष करेल आणि केशराच्या फुलांसारखा फुलेल.”​—यशया ३५:१.

  •   मनाला समाधान देणारं काम देईल. “[देवाने] निवडलेले लोक जे काही काम करतील, त्यापासून त्यांना खूप आनंद मिळेल. त्यांची मेहनत वाया जाणार नाही.”​—यशया ६५:२१-२३.

  •   आजार काढून टाकेल. “‘मी आजारी आहे,’ असं देशातला एकही रहिवासी म्हणणार नाही.”​—यशया ३३:२४.

  •   म्हातारपण काढून टाकेल. “त्याचं शरीर तरुणपणात होतं त्यापेक्षा ताजंतवानं व्हावं; त्याच्या तारुण्यातला उत्साह त्याला परत मिळावा.”​—ईयोब ३३:२५.

  •   मेलेल्यांना पुन्हा जिवंत करेल. “स्मारक कबरींमध्ये असलेले सगळे [येशूची] हाक ऐकतील आणि बाहेर येतील.”​—योहान ५:२८, २९.