व्हिडिओ पाहण्यासाठी

आपल्या संग्रहातून

आधुनिक काळातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा आणि घटनांचा इतिहास वाचा.

इतिहासाच्या पानांतून

“अत्यंत महत्त्वाचा काळ”

झायन्स वॉच टावर मध्ये स्मारकविधीच्या काळाला “अत्यंत महत्त्वाचा काळ” असं म्हणण्यात आलं आणि वाचकांना स्मारकविधी साजरा करण्याचं उत्तेजन देण्यात आलं. सुरवातीच्या काळात स्मारकविधी कसा साजरा केला जात होता?

‘कापणीचे अद्याप बरेच कार्य बाकी आहे’

ब्राझीलमध्ये ७,६०,००० पेक्षा जास्त यहोवाचे साक्षीदार राज्याची सुवार्ता सांगत आहेत. दक्षिण अमेरिकेमध्ये बायबल विद्यार्थ्यांनी कापणीच्या कार्याला कशी सुरुवात केली?

कॅफेटेरियातल्या सुरळीत कामाचं गुपित—प्रेम

यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनांना तुम्ही जर १९९० नंतर उपस्थित राहिला असाल, तर त्यापूर्वी कित्येक दशकं जेवणाची जी व्यवस्था केली जायची त्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

पोर्तुगालमध्ये सत्याचं बी कसं पेरण्यात आलं?

पोर्तुगालमध्ये सुरुवातीच्या प्रचारकांना कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागला?

१८७० ते १९१८

जाहीर भाषणांमुळे आयर्लंड देशात राज्याची आनंदाची बातमी पसरली.

बंधू रस्सल यांना कोणत्या गोष्टीमुळे खात्री पटली होती की “क्षेत्र कापणी करण्यास तयार आहे”?

विश्वासाला पुष्टी देणाऱ्या अविस्मरणीय चित्रपटाची शताब्दी

पहिल्यांदा “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” प्रदर्शित करण्यात आला त्या गोष्टीला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. हा चित्रपट, बायबल देवाचे वचन आहे यावर लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी तयार करण्यात आला होता.

“युरेका ड्रामा”ने अनेकांना सत्याची ओळख करून दिली

“फोटो ड्रामा ऑफ क्रिएशनची संक्षिप्त आवृत्ती असलेला “युरेका ड्रामा,” विजेची सोय नसलेल्या दूरवरच्या भागांतही दाखवणे शक्य होते.

“‘कापणीच्या कामात’ भाग घेऊन मी यहोवाची स्तुती करत आहे”

पहिल्या महायुद्धादरम्यान बायबल विद्यार्थ्यांना ख्रिस्ती तटस्थतेच्या भूमिकेबद्दल पूर्ण समज नव्हती, पण तरी देवाप्रती असलेली त्यांच्या एकनिष्ठतेचं त्यांना चांगलं प्रतिफळ मिळालं.

‘परीक्षाप्रसंगी’ ते खंबीर राहिले

१९१४ मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान बायबल विद्यार्थ्यांनी तटस्थ भूमिका बजावल्याची गोष्ट बऱ्‍याच लोकांच्या नजरेत आली त्याविषयी वाचा.

१९१९ ते १९३०

“ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली”

१९१९ साली झालेल्या अधिवेशनात अशा एका मोठ्या कार्याची सुरवात झाली, ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर होणार होता.

ते “कधी नव्हे इतक्या आवेशानं आणि प्रेमानं भारावून गेले”

१९२२ साली सीडर पॉईंट, ओहायो इथं झालेल्या अधिवेशनात श्रोत्यांना ‘राजा आणि त्याच्या राज्याची घोषणा’ करण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं. अनेकांनी याला कसा प्रतिसाद दिला?

उगवत्या सूर्याच्या देशात सत्याची पहाट

जपानमध्ये राज्याची सुवार्ता घोषित करण्यासाठी खास बनवण्यात आलेल्या “येहू” गाड्यांमुळे खूप मदत झाली.

“सत्य शिकण्यासाठीच यहोवानं तुम्हाला फ्रान्समध्ये आणलं आहे”

१९१९ साली फ्रान्स आणि पोलंडमध्ये जो इमिग्रेशन करार करण्यात आला त्यामुळे चांगले परिणाम घडून आले.

“कासवाच्या कवचासारखं माझं घर नेहमीच माझ्यासोबत असायचं”

१९२९ या वर्षाच्या शेवटी आर्थिक स्थिती अचानक खालावली आणि सर्व जगात महामंदी पसरली. अशा परिस्थितीला पूर्ण वेळेचे प्रचारक कशा प्रकारे सामोरे गेले?

१९३१ ते आजपर्यंत

“जगातल्या कोणत्याही गोष्टीला कॉलपोर्टर म्हणून सेवा करण्याच्या संधीआड येऊ देऊ नका!”

१९३० च्या दशकातील फ्रान्समधल्या पूर्णवेळेच्या सेवकांनी आवेश आणि धीर दाखवण्याच्या बाबतीत एक उत्तम उदाहरण मांडलं आहे.

“कोणताही रस्ता—कठीणही नाही आणि लांबही”

१९२० आणि १९३० च्या दशकात काही आवेशी पायनियरांचा राज्याची सुवार्ता ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम भागांत पोहचण्याचा निश्चय दृढ होता.

“आता आपलं पुढचं संमेलन केव्हा असणार आहे?”

१९३२ मध्ये मेक्सिको सिटीत भरवण्यात आलेलं अधिवेशन साक्षीदारांसाठी इतकं महत्त्वाचं का होतं?

राजा खूश झाला!

स्वाझीलँडच्या एका राजाने कशा प्रकारे बायबलच्या सत्यांप्रती कदर व्यक्‍त केली त्याबद्दल जाणून घ्या.

लाखो लोकांना माहीत असलेली साऊंड कार

१९३६ ते १९४१ दरम्यान ब्राझीलमध्ये असलेल्या मोजक्या साक्षीदारांना “वॉचटावर साऊंड कारमुळे” लाखो लोकांपर्यंत राज्याची संदेश पोचवणं शक्य झालं.

“ब्रिटनमधील राज्य प्रचारकांनो—जागे व्हा!”

ब्रिटनमधील राज्य प्रचारकांमध्ये “मागील दहा वर्षांत कोणतीही लक्षणीय वाढ नाही!” मग यासाठी १९३८ मध्ये कोणती पावलं उचलली गेली ज्यामुळे हे चित्र संपूर्णपणे पालटलं गेलं?