व्हिडिओ पाहण्यासाठी

भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता?

भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता?

या जगाची परिस्थिती . . .

  • आहे तशीच राहील?

  • आणखी वाईट होईल?

  • की, पुढे सुधारेल?

पवित्र शास्त्र असं शिकवतं

“देव . . . त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. यापुढे कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही. कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”​—प्रकटीकरण २१:३, ४, नवे जग भाषांतर.

या शिकवणीचा तुम्हाला काय फायदा होईल?

मनाला समाधान देणारं काम मिळेल.​—यशया ६५:२१-२३.

आजारांतून आणि सर्व प्रकारच्या दुःखांतून कायमची सुटका मिळेल.​—यशया २५:८; ३३:२४.

कुटुंब आणि मित्रांसोबत कायमचं आनंदी जीवन मिळेल.​—स्तोत्र ३७:११, २९.

पवित्र शास्त्रात जे म्हटलं आहे त्यावर आपण खरंच विश्‍वास ठेवू शकतो का?

नक्कीच, याची कमीतकमी दोन कारणं आहेत:

  • देवाकडे हे अभिवचन पूर्ण करण्याची ताकद आहे.  पवित्र शास्त्रात फक्‍त यहोवा देवालाच “सर्वसमर्थ” असं म्हटलं आहे. कारण त्याच्याजवळ अमर्याद शक्‍ती आहे. (प्रकटीकरण १५:३) त्यामुळे या जगाचा कायापालट करून त्याला सुंदर बनवण्याचं अभिवचन पूर्ण करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात म्हटलं आहे: “देवाला सगळं काही शक्य आहे.”​—मत्तय १९:२६.

  • देवाला हे अभिवचन पूर्ण करण्याची मनापासून इच्छा आहे.  उदाहरणार्थ, मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करण्यासाठी यहोवा देव आतुर आहे.​—ईयोब १४:१४, १५.

    पवित्र शास्त्रात हेसुद्धा सांगितलं आहे की देवाचा मुलगा येशू याने लोकांचे रोग बरे केले. त्याने असं का केलं? कारण तसं करायची त्याची मनापासून इच्छा होती. (मार्क १:४०, ४१) आपल्या पित्याप्रमाणेच येशूलासुद्धा गरजू लोकांना मदत करण्याची इच्छा होती.​—योहान ५:१९.

    यावरून आपण खातरी बाळगू शकतो की आपल्याला एक आनंदी आणि चांगलं भविष्य मिळावं, अशी यहोवा आणि येशू या दोघांचीही इच्छा आहे!—स्तोत्र ७२:१२-१४; १४५:१६; २ पेत्र ३:९.

थोडा विचार करा

देव या जगाचा कायापालट करून त्याला सुंदर कसं बनवेल?

याचं उत्तर पवित्र शास्त्रातल्या नीतिवचनं २:२१, २२ आणि दानीएल २:४४ या वचनांत मिळतं.