व्हिडिओ पाहण्यासाठी

जगावर खरंतर कोणाचं नियंत्रण आहे?

जगावर खरंतर कोणाचं नियंत्रण आहे?

तुम्हाला काय वाटतं . . .

  • देवाचं?

  • माणसांचं?

  • की, माहीत नाही कोणाचं?

पवित्र शास्त्र असं शिकवतं

“सगळं जग सैतानाच्या नियंत्रणात आहे.”​—१ योहान ५:१९.

“देवाचा मुलगा यासाठीच आला, की त्याने सैतानाची कार्यं उद्ध्‌वस्त करावीत.”​—१ योहान ३:८, नवे जग भाषांतर.

या शिकवणीचा तुम्हाला काय फायदा होईल?

जगातल्या समस्यांवर तर्काला पटेल असं स्पष्टीकरण मिळेल.​—प्रकटीकरण १२:१२.

जगात नक्कीच सुधारणा होईल असा विश्‍वास बाळगायला ठोस कारण मिळेल.​—१ योहान २:१७.

पवित्र शास्त्रात जे म्हटलं आहे त्यावर आपण खरंच विश्‍वास ठेवू शकतो का?

नक्कीच, याची कमीतकमी तीन कारणं आहेत:

  • सैतानाचं राज्य नाश होण्याच्याच मार्गावर आहे.  मानवजातीला मुठीत ठेवणाऱ्‍या सैतानाचा नाश करण्याचं यहोवा देवाने ठरवलं आहे. त्याने ‘सैतानाला नाहीसं’ करण्याचं आणि सैतानामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचं वचन दिलं आहे.​—इब्री लोकांना २:१४.

  • यहोवा देवाने येशू ख्रिस्ताला जगावर अधिकारी नेमलं आहे.  येशू ख्रिस्त जगावर आत्ता राज्य करत असलेल्या स्वार्थी आणि निर्दयी अधिकाऱ्‍याच्या अगदी उलट आहे. येशूच्या अधिकाराबद्दल यहोवा असं आश्‍वासन देतो: “दीनदुबळ्यांवर आणि गरिबांवर तो दया करेल . . . तो त्यांची अत्याचारापासून आणि हिंसेपासून सुटका करेल.”​—स्तोत्र ७२:१३, १४.

  • देव खोटं बोलूच शकत नाही. पवित्र शास्त्र देवाबद्दल स्पष्टपणे असं सांगतं: “तो कधीही खोटं बोलू शकत नाही.” (इब्री लोकांना ६:१८) देव एकदा का कुठली गोष्ट करण्याचं वचन देतो तेव्हा ती गोष्ट झाल्यातच जमा असते! (यशया ५५:१०, ११) “या जगाच्या राजाला हाकलून दिलं जाईल.”​—योहान १२:३१.

थोडा विचार करा

या जगाच्या अधिकाऱ्‍याला काढून टाकल्यावर जग कसं असेल?

याचं उत्तर पवित्र शास्त्रातल्या स्तोत्र ३७:१०, ११ आणि प्रकटीकरण २१:३, ४ या वचनांत मिळतं.