व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल प्रश्नांची उत्तरे

बायबल प्रश्नांची उत्तरे

मुले देवावर प्रेम करण्यास कशी शिकू शकतात?

सृष्टीतील गोष्टींचा उपयोग करून मुलांना देवाबद्दल जाणून घेण्यास व त्याच्यावर प्रेम करण्यास शिकवा

देव आहे आणि तो मुलांवर प्रेम करतो याचा पुरावा तुमच्या मुलांना मिळाला तर ती देवावर प्रेम करण्यास शिकतील. देवावर प्रेम करण्यासाठी त्यांनी देवाला ओळखले पाहिजे. (१ योहान ४:८) उदाहरणार्थ, देवाने मानवाला का बनवले? देव दुःख का काढून टाकत नाही? भविष्यात मानवजातीसाठी देव काय करणार आहे? हे त्यांना माहीत असले पाहिजे.फिलिप्पैकर १:९ वाचा.

मुलांना देवावर प्रेम करण्यास शिकवायचे असेल, तर तुम्ही स्वतः देवावर प्रेम करता हे त्यांना दाखवा. मुले हे पाहतील तेव्हा तेही देवावर प्रेम करू लागतील.अनुवाद ६:५-७; नीतिसूत्रे २२:६ वाचा.

तुम्ही तुमच्या मुलांच्या मनापर्यंत कसे पोहचू शकता?

देवाचे वचन खूप शक्तिशाली आहे. (इब्री लोकांस ४:१२) तेव्हा, बायबलच्या मूलभूत शिकवणी तुमच्या मुलांना शिकवा. येशूने लोकांच्या मनापर्यंत पोहचण्यासाठी प्रश्न विचारले; त्यांचे लक्षपूर्वक ऐकले आणि शास्त्रवचनांचे स्पष्टीकरण दिले. तुमच्या मुलांच्या मनापर्यंत पोहचण्यासाठी तुम्हीही तेच करू शकता.लूक २४:१५-१९, २७, ३२ वाचा.

देवाने पूर्वीच्या लोकांशी कसा व्यवहार केला याचे अनेक अहवाल बायबलमध्ये आहेत; या अहवालांवरूनही मुले देवाला ओळखण्यास व त्याच्यावर प्रेम करण्यास शिकतील. त्यासाठी www.pr418.com या वेबसाईटवर अनेक प्रकाशने उपलब्ध आहेत.२ तीमथ्य ३:१६ वाचा. (w14-E 12/01)