व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एक आश्चर्यकारक घटक

एक आश्चर्यकारक घटक

“जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व घटकांपैकी कार्बन हा सर्वात आवश्यक घटक आहे,” असं नेचर्स बिल्डिंग ब्लॉक्स या पुस्तकात म्हटलं आहे. कार्बनमध्ये असलेल्या असाधारण वैशिष्ट्यांमुळे तो स्वतःशी आणि इतर रासायनिक घटकांशी सहज जोडला जातो. यामुळेच कार्बनच्या आणि इतर धातूंच्या लाखो संयुगांचा सतत शोध लावला जातो किंवा ती बनवली जातात.

आपण या खालील उदाहरणांत पाहू शकतो की, कार्बनचे अणू वेगवेगळ्या आकारात एकत्र येऊ शकतात. जसं की साखळी, पिरॅमिड, गोलाकार, नळ्यांचा आकार आणि इतर अनेक आकार. कार्बन खरोखर एक आश्चर्यकारक घटक आहे! (g16-E No. 5)

हिरा

कार्बनचे अणू पिरॅमिडच्या आकारात एकत्र येतात ज्यांना टेट्राहेड्रॉन्स म्हणतात. या रचनेमुळेच हिरा हा नैसर्गिक रीतीने तयार होणारा सर्वात कठीण पदार्थ आहे. एक सर्वोत्तम हिरा म्हणजेच कार्बनच्या अणूंनी मिळून बनलेला एक परमाणू.

ग्रॅफाईट

घट्टपणे एकत्र असलेले कार्बनचे अणू सैल थरांवर मांडलेले असतात. पेपरच्या गठ्ठ्यावरून जसे पेपर निसटू शकतात तसे हे अणू निसटू शकतात. याच गुणधर्मामुळे ग्रॅफाईट शिस्याच्या पेन्सिलमधलं मुख्य घटक आहे आणि ते वंगणाचंदेखील काम करते.

ग्राफिन

हे कार्बनचे अणू एका थरात षटकोनी जाळीच्या आकारात विणलेले असतात. ग्राफिनची ताण सहन करण्याची शक्ती स्टीलच्या कित्येक पट जास्त असते. पेन्सिलने जेव्हा पेपरवर लिहिलं जातं तेव्हा त्यात थोड्या प्रमाणात ग्राफिनचे एक किंवा अनेक थर असतात.

फुलरेन्स

कार्बनचे हे अणू सूक्ष्म गोळ्यांच्या आणि नळ्यांच्या आकारात असतात ज्यांना नॅनोट्युब्स म्हणतात. त्यांचा आकार नॅनोमीटर्समध्ये मोजला जातो. १०० करोड नॅनोमीटर म्हणजे एक मीटर.

जीवसृष्टी

झाडं, प्राणी आणि माणसं यांची रचना ज्या पेशींपासून केली जाते त्यांचा मुख्य घटक म्हणजे कार्बन. हा घटक कार्बोहायड्रेट्‌स, चर्बी आणि अमायनो अॅसिड्‌स यांमध्ये आढळतो.

“[देवाचे] सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.”—रोमकर १:२०.

* ऑक्टोबर २००७ मधल्या सावध राहा! अंकात “कोणाजवळ पेन्सिल आहे का?” हा लेख पाहा