व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार घरोघरी का जातात?

यहोवाचे साक्षीदार घरोघरी का जातात?

 येशूने आपल्या अनुयायांना सांगितले की, “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.” (मत्तय १०:१९, २०) त्याने त्याच्या सुरुवातीच्या शिष्यांना सेवाकार्य करण्यासाठी पाठवले तेव्हा त्याने त्यांना लोकांच्या घरी जाण्यास सांगितले. (मत्तय १०:७, ११-१३) येशूच्या मृत्यूनंतर, पहिल्या शतकातील ख्रिश्‍चन “चार लोकांत व घरोघरी” जाऊन शिकवत राहिले. (प्रेषितांची कृत्ये ५:४२; २०:२०) सुरुवातीच्या त्या ख्रिश्‍चनांचे अनुकरण करून आज आम्हीसुद्धा घरोघरी जाऊन देवाच्या राज्याचा संदेश सांगतो; कारण लोकांपर्यंत पोहचण्याचा हा एक उत्तम मार्ग असल्याचे आम्ही अनुभवले आहे.