व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबल पुस्तकांची प्रस्तावना

बायबलमधल्या प्रत्येक पुस्तकाबद्दल माहिती असलेले छोटे-छोटे व्हिडिओ पाहा.

उत्पत्ति पुस्तकाची प्रस्तावना

उत्पत्ति पुस्तकात मानवांच्या उगमाबद्दल आणि दुःख आणि मृत्यूची सुरुवात कशी झाली याबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

गणना पुस्तकाची प्रस्तावना

सर्व परिस्थितीत यहोवाच्या आज्ञा पाळणं आणि नेतृत्व करण्यासाठी त्याने निवडलेल्या लोकांचा आदर करणं का गरजेचं आहे ते पाहा.

अनुवाद पुस्तकाची प्रस्तावना

नियमशास्त्रात दिलेल्या आज्ञांवरून यहोवाचं त्याच्या लोकांवर प्रेम आहे, हे कसं दिसून येतं, ते पाहा.

यहोशवा पुस्तकाची प्रस्तावना

इस्राएली लोक वचन दिलेल्या देशाचा ताबा कसा मिळवतात आणि जमिनीची वाटणी कशी केली जाते ते पाहा.

शास्ते पुस्तकाची प्रस्तावना

शास्ते या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं की देवाने कशा प्रकारे शास्त्यांचा उपयोग करून त्याच्या लोकांना जुलूम करणाऱ्‍यांपासून वाचवलं. याच कारणामुळे या पुस्तकाला शास्ते असं नाव देण्यात आलं.

रूथ पुस्तकाची प्रस्तावना

रूथचं पुस्तक अशा एका तरुण विधवेबद्दल आहे, जी आपल्या विधवा सासूला निःस्वार्थ प्रेम दाखवते आणि यहोवा त्या दोघींना आशीर्वाद देतो.

१ शमुवेल पुस्तकाची प्रस्तावना

इस्राएलमध्ये न्यायाधीशांचा काळ जाऊन राजांचा इतिहास कसा सुरू होतो ते पाहा.

२ शमुवेल पुस्तकाची प्रस्तावना

दावीदची नम्रता आणि त्याचा विश्‍वास लोकांना त्याच्याबद्दल जाणून घ्यायला का उत्तेजन देतो ते पाहा.

१ राजे पुस्तकाची प्रस्तावना

शलमोन राजाच्या शासनाखाली इस्राएलमध्ये किती भरभराट आणि समृद्धी होती ते पाहा. पण त्यानंतर इस्राएल राष्ट्रात पुढे फूट पडून सगळ्याची उलथापालथ कशी झाली तेसुद्धा पाहा.

२ राजे पुस्तकाची प्रस्तावना

इस्राएलच्या उत्तरेच्या राज्यात खोटी उपासना कशी पसरत गेली, पण यहोवाने पूर्ण मनाने त्याची सेवा करणाऱ्‍यांना आशीर्वाद कसा दिला ते पाहा.

१ इतिहास पुस्तकाची प्रस्तावना

दावीद राजाची वंशावळ पाहा. तसंच, देवाला विश्‍वासू राहणाऱ्‍या या राजाने इस्राएलवर राज्य करायला सुरुवात केली तेव्हापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंतचा इतिहास पाहा.

२ इतिहास पुस्तकाची प्रस्तावना

देवाला एकनिष्ठ राहण्याचं महत्त्व आपल्याला यहूदामधल्या राजांच्या इतिहासावरून कळतं.

एज्रा पुस्तकाची प्रस्तावना

बाबेलच्या बंदिवासातून आपल्या लोकांची सुटका करण्याचं आणि यरुशलेममध्ये खरी उपासना पुन्हा सुरू करण्याचं वचन यहोवा पूर्ण करतो.

नहेम्या पुस्तकाची प्रस्तावना

बायबलमधल्या नहेम्या पुस्तकात आजच्या काळातल्या सर्व खऱ्‍या उपासकांसाठी महत्त्वाचे धडे दिले आहेत.

एस्तेर पुस्तकाची प्रस्तावना

एस्तेरच्या काळात घडलेल्या नाट्यमय घटनांमुळे यहोवाजवळ आपल्या लोकांना संकंटातून सोडवण्याची ताकद आहे, या गोष्टीवर तुमचा विश्‍वास मजबूत होईल.

ईयोब पुस्तकाची प्रस्तावना

यहोवावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांवर परीक्षा येतील. ईयोबच्या अहवालामुळे आपल्याला खातरी मिळते, की आपण आपली एकनिष्ठा टिकवून ठेऊ शकतो आणि यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करू शकतो.

स्तोत्र पुस्तकाची प्रस्तावना

स्तोत्र पुस्तकात यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन केलं आहे. हे पुस्तक यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांना मदत आणि सांत्वन देतं आणि त्याच्या राज्याद्वारे जगाची परिस्थिती कशी बदलेल हे दाखवतं.

नीतिसूत्रे पुस्तकाची प्रस्तावना

पैशांच्या व्यवहारांपासून ते कौटुंबिक विषयांपर्यंत, जीवनाच्या प्रत्येक पैलूबद्दल देवाचं मार्गदर्शन मिळवा.

उपदेशक पुस्तकाची प्रस्तावना

शलमोन राजाने जीवनात कोणत्या गोष्टी खरंच महत्त्वाच्या आहेत हे सांगितलं आणि देवाच्या बुद्धीच्या विरोधात असलेल्या गोष्टींशी त्यांची तुलना केली.

गीतरत्न पुस्तकाची प्रस्तावना

शुलेमच्या मुलीला एका मेंढपाळ मुलावर असलेल्या अटळ प्रेमाला “परमेशाने प्रदीप्त केलेला अग्नी” म्हणण्यात आलं आहे. याचा काय अर्थ होतो?

यशया पुस्तकाची प्रस्तावना

यशयाच्या पुस्तकात अचूक भविष्यवाण्या दिल्या आहेत. यांमुळे, अभिवचनं पूर्ण करणाऱ्‍या आणि आपलं तारण करणाऱ्‍या यहोवा देवावरचा आपला विश्‍वास मजबूत होतो.

यिर्मया पुस्तकाची प्रस्तावना

बरीच संकटं आली तरीही यिर्मया विश्‍वासूपणे देवाने दिलेलं काम करत राहिला. त्याच्या उदाहरणावरून आजचे ख्रिस्ती काय शिकू शकतात यावर विचार करा.

विलापगीत पुस्तकाची प्रस्तावना

यिर्मया संदेष्ट्याने लिहिलेल्या या पुस्तकात यरुशलेमच्या नाशाविषयी दुःख व्यक्‍त करण्यात आलं आहे आणि पश्‍चात्ताप केल्यामुळे देवाकडून क्षमा कशी मिळते हे सांगितलं आहे.

यहेज्केल पुस्तकाची प्रस्तावना

देवाने दिलेलं प्रत्येक काम यहेज्केलने धाडसाने आणि नम्रतेने केलं. आज आपण त्याच्या उदाहरणातून बरंच काही शिकू शकतो.

दानीएल पुस्तकाची प्रस्तावना

दानीएल आणि त्याचे सोबती सर्व परिस्थितींत यहोवाला विश्‍वासू राहिले. त्यांच्या उदाहरणामुळे आणि भविष्यवाणीच्या पूर्णतेमुळे आपल्याला या शेवटल्या दिवसांत फायदा होऊ शकतो.

होशेय पुस्तकाची प्रस्तावना

होशेयच्या भविष्यवाणीत आज आपल्यासाठी महत्त्वाचे धडे दिले आहेत. ते धडे यहोवा पश्‍चात्ताप करणाऱ्‍या अपराध्यांना दाखवलेल्या दयेबद्दल आणि त्याची उपासना कशी करावी याबद्दल आहेत.

योएल पुस्तकाची प्रस्तावना

योएल संदेष्ट्याने येणाऱ्‍या यहोवाच्या  दिवसाची भविष्यवाणी केली आणि बचावासाठी काय करण्याची गरज आहे याबद्दलही सांगितलं. या भविष्यवाणीवर आज लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे.

आमोस पुस्तकाची प्रस्तावना

या नम्र व्यक्‍तीचा उपयोग यहोवाने एका अतिशय महत्त्वाच्या कामासाठी केला. आमोसच्या उदाहरणापासून आपण कोणता मौल्यवान धडा शिकू शकतो?

ओबद्या पुस्तकाची प्रस्तावना

हे पुस्तक इब्री शास्त्रवचनांतलं सर्वात लहान पुस्तक आहे. यात दिलेल्या भविष्यवाण्यांमुळे यहोवाच्या राजपदाचा गौरव होण्याचं वचन आणि आशा मिळते.

योना पुस्तकाची प्रस्तावना

योनाने स्वतःची चूक कबूल केली, त्याची नेमणूक पूर्ण केली आणि तो देव दाखवत असलेलं एकनिष्ठ प्रेम व करुणा यांबद्दल महत्त्वाचा धडा शिकला. त्याचा अनुभव तुमच्या मनाला भिडेल.

मीखा पुस्तकाची प्रस्तावना

देवाने केलेल्या भविष्यवाणीमुळे आपल्याला खात्री पटते की यहोवा आपल्याकडून वाजवी आणि आपल्याला फायदा होईल अशाच गोष्टींची अपेक्षा करतो. यामुळे आपला विश्‍वास आणखी मजबूत होतो.

नहूम पुस्तकाची प्रस्तावना

ही भविष्यवाणी आपल्याला हा भरवसा देते की यहोवा आपलं वचन नेहमी पूर्ण करतो आणि त्याच्या राज्यात शांती आणि उद्धार मिळणाऱ्‍यांचं तो सांत्वन करतो.

हबक्कूक पुस्तकाची प्रस्तावना

आपण भरवसा ठेवू शकतो की आपल्या लोकांना वाचवण्यासाठी कोणती वेळ आणि पद्धत योग्य आहे हे यहोवाला माहीत आहे.

सफन्या पुस्तकाची प्रस्तावना

यहोवाचा न्यायाचा दिवस येणार नाही असा विचार आपण का करू नये?

हाग्गय पुस्तकाची प्रस्तावना

स्वतःच्या इच्छांपेक्षा यहोवाच्या उपासनेला प्रथम स्थान देण्याच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे.

जखऱ्‍या पुस्तकाची प्रस्तावना

देवाकडून मिळणाऱ्‍या अनेक दृष्टान्तांद्वारे आणि भविष्यवाण्यांद्वारे गतकाळात देवाच्या लोकांचा विश्‍वास मजबूत झाला. या भविष्यवाण्यांमुळे आपल्यालासुद्धा ही खात्री पटते की यहोवा आज आपल्याला सांभाळत आहे.

मलाखी पुस्तकाची प्रस्तावना

ही अशी भविष्यावाणी आहे ज्यामध्ये यहोवाच्या न बदलणाऱ्‍या तांबद्दल, दयेबद्दल आणि प्रेमाबद्दल सांगण्यात आलं आहे. या भविष्यवाणीपासून आज आपल्यालासुद्धा महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात.

मत्तय पुस्तकाची प्रस्तावना

बायबलमधल्या शुभवर्तमानाच्या चार पुस्तकांपैकी या पहिल्या पुस्तकाबद्दल मुख्य मुद्दे जाणून घ्या.

मार्क पुस्तकाची प्रस्तावना

शुभवर्तमानाच्या चार पुस्तकांपैकी हे सर्वात लहान पुस्तक आहे. भविष्यात येणाऱ्‍या देवाच्या राज्यात येशू कशा प्रकारे शासन करेल याची एक झलक यात पाहायला मिळते.

लूक पुस्तकाची प्रस्तावना

कोणती माहिती फक्‍त लूकच्या शुभवर्तमानातच वाचायला मिळते?

याकोबच्या पत्राची प्रस्तावना

महत्त्वाच्या ख्रिस्ती तत्त्वांना शिकवण्यासाठी याकोबने जबरदस्त उदाहरणांचा वापर केला आहे.

१ पेत्र पुस्तकाची प्रस्तावना

पेत्रचं पहिलं पत्र आपल्याला यहोवाच्या सेवेत व्यस्त राहण्याचं आणि देवावर आपल्या सर्व चिंता टाकण्याचं प्रोत्साहन देतं.

२ पेत्र पुस्तकाची प्रस्तावना

पेत्रच्या दुसऱ्‍या पत्रात नव्या आकाशाची आणि नव्या पृथ्वीची वाट पाहत असताना विश्‍वासू राहायचं प्रोत्साहन आपल्याला मिळतं.

१ योहान पुस्तकाची प्रस्तावना

योहानचं पत्र आपल्याला ख्रिस्तविरोधकांपासून सावध राहण्याचा इशारा देतं. आणि आपण कशावर प्रेम करावं आणि कशावर नाही हे समजायला मदत करतं.

३ योहान पुस्तकाची प्रस्तावना

योहानचं हे तिसरं पत्र आपल्याला पाहुणचार दाखवण्याची वृत्ती बाळगण्याचं उत्तेजन देतं

यहूदा पुस्तकाची प्रस्तावना

मंडळीतल्या बांधवांची दिशाभूल करून त्यांना भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या लोकांच्या वेगवेगळ्या युक्त्यांना यहूदाने उघड केलं आहे.

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

पुस्तके आणि माहितीपत्रके

बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?

बायबलचा मुख्य संदेश काय आहे?