व्हिडिओ पाहण्यासाठी

खासगी धोरण

खासगी धोरण

वैयक्‍तिक माहिती

या वेबसाईटवरून तुम्ही दिलेली वैयक्‍तिक माहिती तुमच्याकडून ज्या कारणासाठी घेतली होती त्या कारणासाठीच, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यू यॉर्क, निगमित किंवा त्यांच्या सहकारी संघटना ती माहिती वापरते. युजरने विनंती केल्याखेरीज व युजरला पूर्ण माहिती दिल्याखेरीज किंवा कायद्यानुसार नियमांची पूर्तता करण्याकरता अथवा फसवणुकीची शहनिशा करण्याकरता अथवा ती टाळण्याकरता, सुरक्षा किंवा तांत्रिक बाबींसाठी आवश्‍यक असल्याखेरीज वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी, निगमित कोणालाही तुमची वैयक्‍तिक माहिती देत नाही. आमच्याकडे असलेली वैयक्‍तिक माहिती कोणत्याही परिस्थितीत विकली जाणार नाही, कशाच्या बदल्यात दिली जाणार नाही किंवा भाड्याने दिली जाणार नाही.

ई-मेल ॲड्रेस

तुमच्या अकाउंटच्या बाबतीत काही माहिती हवी असेल तर, या वेबसाईटवर अकाउंट तयार करताना तुम्ही दिलेल्या ई-मेल ॲड्रेसचा उपयोग केला जाईल. उदाहरणार्थ, तुम्ही जर तुमचे युजर नेम किंवा पासवर्ड विसरलात व लॉग-ईनसाठी मदत मागितली तर तुमच्या युजर प्रोफाईलमध्ये तुम्ही दिलेल्या ई-मेल ॲड्रेसवरून तुम्हाला एक मेसेज पाठवला जाईल.

कुकीज

jw.org. वापरत असताना, प्रेफरेन्सेस लक्षात ठेवण्यासाठी युजर कुकीजचा उपयोग करतो. उदाहरणार्थ, jw.org ज्या भाषेत पाहायचे आहे ती इच्छित भाषा, एका कुकीत स्टोर करण्यात येते जेणेकरून पुढच्या वेळी जेव्हा युजर वेबसाईटवर पुन्हा येतो तेव्हा ही भाषा निवडली जाते. कुकीजमध्ये कोणतीही वैयक्‍तिक माहिती साठवली किंवा स्टोर केली जात नाही.

ॲक्टीव्ह स्क्रिप्टींग किंवा जावास्क्रिप्ट

वेबसाईटचे कार्य सुधारण्याकरता jw.org स्क्रिप्टींगचा उपयोग करते. स्क्रिप्टींगच्या तंत्रज्ञानामुळे, jw.org लगेचच युजरला माहिती पुरवते. युजरच्या कंप्यूटरवर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याकरता किंवा युजरकडून अनाधिकृत माहिती मिळवण्याकरता jw.org केव्हाही स्क्रिप्टींगचा उपयोग करत नाही.

jw.org च्या काही भागांचे कार्य व्यवस्थित चालावे म्हणून ब्राऊजरमध्ये ॲक्टीव्ह स्क्रिप्ट किंवा जावास्क्रिप्ट सक्रीय करण्याची गरज आहे. बहुतेक वेब ब्राऊजर्स काही विशिष्ट वेबसाईट्‌सला हे फिचर सक्रीय किंवा निष्क्रीय करू देतात. विशिष्ट वेबसाईट्‌ससाठी स्क्रिप्टींग सक्रीय कशी करायची त्याच्या अधिक माहितीसाठी वेब ब्राऊजरवर हेल्प डॉक्यूमेंटेशन पाहावे.

आमचे खासगी धोरण बदलण्याची कधी गरज पडलीच तर आम्ही ते बदल या पानावर पोस्ट करू जेणेकरून तुम्हाला नेहमी हे कळेल, की आम्ही कोणत्या प्रकारची माहिती कलेक्ट करतो व ती कशी वापरतो.