व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

JW LANGUAGE

JW Language Features

JW Language Features

अनेक भाषांचा समावेश

उपलब्ध असलेल्या १८ भाषांपैकी तुम्हाला जी भाषा शिकायची आहे ती निवडा. बंगाली, चीनी (सोपी) आणि मँडरिन ऑडीओ, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इंडोनेशियन, इटालियन, जपानी, कोरियन, म्यानमार, पोर्तुगिज, रशियन, स्पॅनिश, स्वाहिली, तगालोग, थाई आणि तुर्की यांतून तुम्ही निवडू शकता.

 

क्षेत्र सेवेत उपयोगी पडणारी माहिती

JW लँग्वेज या ॲपवर बायबलमध्ये वापरण्यात आलेले शब्द आणि वाक्यांश आहेत; ते प्रचारकार्यात आणि शिकवण्यात उपयोगी पडतील. तुमची स्थानिक भाषा आणि तुम्ही शिकत असलेली भाषा यांत तुलना करण्यासाठी या ॲपवर अनेक पत्रिकांचाही समावेश करण्यात आला आहे.

 

भाषा शिकण्याच्या सोप्या पद्धती

  • वाचा: तुम्ही शिकत असलेली भाषा आणि स्थानिक भाषा यांत तुलना करा

  • ऐका: स्थानिक भाषा बोलणारे प्रत्येक शब्दाचा, वाक्यांशाचा आणि प्रकाशनाचा उच्चार कसा करतात ते ऐका

  • पाहा: तुम्ही शिकत असलेल्या भाषेत आणि स्थानिक भाषेत बायबलचा अभ्यास का करावा? आणि बायबल अभ्यास कसा चालवला जातो? हे व्हिडिओ पाहा

  • क्वीझ: फ्लॅश-कार्ड मोड

 

तुमच्या आवडीनुसार निवड करा

सर्रास वापरले जाणारे किंवा कठीण वाटणारे कोणतेही शब्द पटकन पाहण्यासाठी फेव्हरेट म्हणून सेव्ह करा. तुमचे फेव्हरेट्‌स तुम्ही फ्लॅश-कार्ड मोडवरसुद्धा पाहू शकता.

 

रोमनाइझेशन

ज्या भाषांमध्ये रोमन लिपीचा वापर केला जात नाही त्या भाषांमध्ये, रोमन लिपीत शब्द आणि वाक्यांश दाखवण्यात आले आहेत.

 

सपोर्ट

JW लँग्वेज हे ॲप वापरताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कृपया ऑनलाईन हेल्प फॉर्म भरून पाठवा.